पोलिसांच्या निवासस्थानासाठी बुधवारी हलगीनाद आंदोलन करणार:-माऊली हळनवर
प्रतिनिधी / पंढरपुर
पंढरपूर शहर येथे असलेल्या पोलीस लाईन मध्ये पोलिसांच्या निवासस्थानाची अवस्था अत्यंत वाईट झाली असून पोलिसांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे या भागात प्रचंड वाढलेली आहे जप्त केलेली वाहने याच ठिकाणी लावलेले आहेत गटारी तुंबलेल्या आहेत घान पाणी साचुन डासाचे प्रमाण वाढले आहे कवले तुटल्यामुळे पावसाचे पाणी घरामध्ये येत असते झाडी वाढल्यामुळे सरपटणारे प्राणी या ठिकाणी फिरत असतात पोलिसांचे कुटुंबीयाना साप चावण्याची शक्यता आहे या भागामध्ये रोड लाईट नसल्यामुळे अंधार चे सामराज्य असते रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कसलेही लक्ष देत नाही हा विभाग इतर ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे करतो परंतु पोलीस वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कुठलंही काम या भागामध्ये केलेल नाही नळाची जोडणी पण केलेले नाही गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने मागणी होत असताना सार्वजनिक बांधकाम खाते लक्ष द्यायला तयार नाही कोरणा च्या काळामध्ये प्रचंड काम करणाऱ्या पोलिसांची ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांची अवस्था काय होत असेल यामुळे पोलीस कुटुंबीयांमध्ये सार्वजनिक बांधकामाच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बुधवार दिनांक ९/६/२०२१ रोजी ११ वाजता हलगी नाद आंदोलन करण्यात येईल असे निवेदन पंढरपूरचे तहसीलदार व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आज देण्यात आले यावेळी किसान मोर्चाचे राज्य सचिव माऊली हळणवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा सुभाष मस्के रयत क्रांती चे दीपक भोसले बबन येळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते